होलसेल व्यापाऱ्यांच्या समस्या आणि त्यावरचे उपाय

. 1 min read
होलसेल व्यापाऱ्यांच्या समस्या आणि त्यावरचे उपाय

होलसेल व्यापारी किंवा डिस्ट्रीब्यूटरच्या गोदामांमध्ये खचाखच भरलेला माल, काऊंटरवर दिसणारी गुलाबी नोटा आणि चेक यांची आवक-जावक बघून कुणालाही वरकरणी असे वाटेल की, ते रग्गड नफा मिळवत असतील. हेच बघून अनेक लोक फसतात आणि कुठलाही विचार ना करता सरळ या व्यवसायामध्ये पैसे गुंतवतात. या व्यवसायात आल्यावरच त्यांना यातल्या खऱ्या अडचणी कळतात. सांगायचा हेतू हा की, कितीही मोठा डिस्ट्रीब्यूटर असो व होलसेल व्यापारी, प्रत्येकाला काही ना काही समस्या असतात. होलसेल व्यापाऱ्यांना रोजच्या व्यापारात कोणकोणत्या अशा 10 समस्या येतात, ते बघू या आणि त्या दूर करण्याचे उपायहि बघू या.

  1. कारखानदारांची किंवा निर्मात्यांची मनमानी
  2. मालाचा पुरवठा किंवा सप्लाय करण्यासाठी अपुरा वेळ
  3. डिझेल/ पेट्रोलच्या वाढत्या किमती
  4. गोदामातील मालाची व्यवस्था
  5. ई-कॉमर्स बिझनेसचा वाढता दुष्प्रभाव
  6. ग्राहकांच्या वाढत्या नवनवीन मागण्या
  7. रिटेलर्स आणि कारखानदारांचे साटेलोटे
  8. मोठ्या गुंतवणुकीवर कमी नफा
  9. कामगारांच्या सुरक्षिततेची चिंता
  10. मोठ्या रिटेलर्सची बाजारपेठेतली मक्तेदारी किंवा एकाधिकार

1. कारखानदारांची किंवा निर्मात्यांची मनमानी

होलसेलर्स किंवा डिस्ट्रीब्यूटर्स कारखानदारांकडून मोठ्या किंवा घाऊक प्रमाणात सामान विकत घेऊन ते फुटकळ किंवा रिटेल विक्रेत्यांना विकतात. परंतु आजकालच्या वाढत्या स्पर्धेच्या युगात कारखानदारांचा जणू पूरच आला आहे. त्यांच्यामध्ये होणाऱ्या जीवघेण्या स्पर्धेत होलसेलर्सची खूप ओढाताण होते. याचबरोबर होलसेलर्स किंवा घाऊक विक्रेत्यांना डावलून कारखानदार सरळ त्यांच्या क्षेत्रातील फुटकळ विक्रेत्यांना म्हणजेच रिटेलर्सना मालाचा पुरवठा करतात. यामुळे ठोक व्यापाऱ्यांना रोजच नवनवीन प्रश्नांचा सामना करावा लागतो.

उपाय

कारखानदार किंवा निर्मात्या कंपनीकडून माल खरेदी करण्यापूर्वी होलसेल व्यापारी एक करार करू शकतात की, कारखानदार किंवा निर्माते आपला माल सरळ रिटेलर्सला विकू शकणार नाहीत किंवा होलसेल व्यापाऱ्यांच्या संमतीशिवाय दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीला आपला होलसेलर किंवा डिस्ट्रीब्यूटरही बनवू शकणार नाहीत, तसेच ज्या भावात ते त्यांना घाऊकमध्ये सामान विकतात, त्या भावात ते इतर कोणत्याही होलसेलरला सामान विकू शकणार नाहीत. याशिवाय होलसेलर्स आपल्या फुटकळ विक्रेत्यांच्या मागणीप्रमाणे सामानाचा पुरवठा वेळेवर करून परस्पर संबंध अधिक दृढ करू शकतात. कारण, जर होलसेलर्सकडून त्यांना वेळेवर माळ मिळाला, तर ते दुसऱ्या होलसेलर किंवा थेट कारखानदाराकडे जाणार नाहीत.

2. मालाचा पुरवठा किंवा सप्लाय करण्यासाठी अपुरा वेळ

किरकोळ विक्रेते किंवा रिटेलर्सच्या मनमानीमुळेही होलसेल व्यापाऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. मोठ्या प्रमाणावर सामान खरेदी करणारे काही दुकानदार सामानाचा पुरवठा किंवा ऑर्डर पूर्ण करण्यासाठी खूप कमी वेळ देतात. कधीकधी इतक्या कमी वेळात होलसेल व्यापाऱ्यांना दुकानदारापर्यंत सामान पोहोवणे कठीण होऊन बसते. सामानाची डिलिव्हरी जर वेळेत झाली नाही, तर दुकानदार त्यांना   दंडाची रक्कमही भरायला लावतात. तसेच, सामानाबद्दल पूर्ण माहिती ना दिल्यासही दंड भरायला लावतात. त्यामुळे होलसेल व्यापाऱ्यांवर बराच ताण येतो.

उपाय

सर्वात आधी आपली लॉजिस्टिक सर्व्हिस तपासा. आपल्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या दुकानदारांची एक यादी बनवा. त्यांच्या मागण्या किंवा ऑर्डर्स कशाप्रकारच्या असतात, हेही एकदा बघा. हा सर्व होमवर्क झाल्यावर त्या दुकानदारांच्या मागणीनुसार आधीच तयारी राहा. जर आपण एखाद्या लॉजिस्टिक सर्व्हिस देणाऱ्या कंपनीला काम देणार असाल तर, त्यांच्याकडून काटेकोरपणे काम करवून घ्या. जर ते आपल्या इच्छेनुसार काम करायला तयार नसतील, तर त्यांना लगेच बदला. याशिवाय, या कामात एखाद्या तज्ज्ञांचा सल्ला घ्या. ते आपल्या समस्येवर योग्य उपाय शोधतील.

3. डिझेल/ पेट्रोलच्या वाढत्या किमती

होलसेलचा संपूर्ण व्यवसाय ट्रान्सपोर्टवर अवलंबून असतो. म्हणूनच पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींची होलसेल व्यापारात होणाऱ्या नफ्यामध्ये महत्वपूर्ण भूमिका असते. त्या किंमतींनुसारच या व्यवसायात होणारा खर्च वाढतो किंवा घटतो. बहुतांश होलसेलर्स याला इंधन अधिभार किंवा फ्युएल सरचार्ज म्हणून बिलात जोडतात. पण छोट्या कंपन्या हा खर्च लक्षात घेत नाहीत, म्हणून त्या नंतर अडचणीत सापडतात.

उपाय

होलसेल व्यापाऱ्याने सुरुवातीलाच आपल्या इंधन अधिभार किंवा फ्युएल सरचार्जबद्दल आपल्या दुकानदाराला सांगितले पाहिजे. तसेच, एका विशिष्ट अंतरापर्यंतच मोफत डिलिव्हरी दिली पाहिजे. म्हणजे मग नंतर गैरसमज किंवा वादविवाद होत नाहीत. यासाठी होलसेलर्स जर स्वतःचे वाहन वापरून मालाची डिलिव्हरी करतील तर ते जास्त चांगले होईल. रिटेलरला याही गोष्टीची कल्पना द्यावी की, वाढत्या किंवा घटत्या किंमतीनुसार होणारा खर्चही वाटून घ्यावा लागेल.

4. गोदामातील मालाची व्यवस्था

गोदामातील मालाची व्यवस्था ही होलसेल व्यापाऱ्यांसाठी नवीन गोष्ट नाही. पण जर हीच व्यवस्था जर नीट लागली नसेल, तर मोठी समस्या उभी राहण्याचा संभव असतो. आणि नंतर त्याची उस्तवार हे एक मोठेच काम होऊन बसते.

उपाय

जर आपण एक होलसेल व्यापारी बानू इच्छित असाल, तर आपल्याला सामानाची खरेदी, ते गोदामांत साठवणे आणि ते वेळेवर आपल्या ग्राहकाकडे म्हणजे दुकानदार किंवा रिटेलरकडे पोहोचवणे, हे उत्तमप्रकारे यायला पाहिजे. यासोबतच, या क्षेत्रात होणाऱ्या रोजच्या बदलांकडेही आपले लक्ष पाहिजे. जर आपण गोदामातील मालाचे व्यवस्थापन म्हणजेच इन्व्हेंटरी मॅनेजमेंटवर लक्ष दिले नाही तर आपला होलसेलचा बिझनेस डगमगू शकतो. म्हणूनच, सामान खरेदी करून ते रिटेलर्सपर्यंत वेळेत पोहोचवण्यापर्यंत, जी जी कामे करावी लागतात आणि त्यामध्ये ज्या ज्या अनेक बारीकसारीक अडचणी येतात, त्यांचा संपूर्ण विचार करून आणि आपल्या कामगारांसोबत बोलून त्यांचे समाधान शोधावे लागेल. या समस्यांवर उपाय शोधण्यासाठी आजकाल बाजारात अनेक सॉफ्टवेअर्स पण उपलब्ध आहेत.

5. ई-कॉमर्स बिझनेसचा वाढता दुष्प्रभाव

आजकल झपाट्याने वाढलेला आणि वाढतच जाणारा ई-कॉमर्स बिझनेससुद्धा होलसेल व्यापाऱ्यांसाठी एक मोठा चिंतेचा विषय होऊन बसला आहे. बिझनेस-टू-बिझनेस म्हणजेच B2B ट्रेंड होलसेल व्यापाला प्रभावित करतो आहे. जर होलसेल व्यापारी ऑनलाईन बिझनेस करत नसेल तर त्याला अनेक समस्यांचा सामना करावा लागतो.

उपाय

सुमारे दहा वर्षे व्यापारात राहूनही जर होलसेल व्यापारी ई-कॉमर्स बिझनेस समजू शकत नसेल तर, ही त्याच्यासाठी एक मोठीच समस्या म्हणावी लागेल.सर्वात आधी आपल्याला ऑनलाईन पद्धतीचा स्वीकार करावा लागेल. वेबसाईट बनवून त्यावर आपल्याला आपल्या व्यवसायाबद्दल माहिती द्यावी लागेल. आजकाल लोक फोनवर बोलण्यापेक्षा आपल्या वेबसाईटवरील कॅटलॉग बघणेच पसंत करतात. आणि त्याद्वारेच आपल्या प्रॉडक्टबद्दल बारीकसारीक माहिती घेऊन ऑर्डर देणे त्यांना जास्त सोयीचे वाटते. त्यामुळे, या नवीन बदलासाठी जर आपण स्वतःला तयार कराल तर आपल्या बरीच समस्या दूर होऊ शकतील.

6. ग्राहकांच्या वाढत्या नवनवीन मागण्या

होलसेल व्यापाऱ्याला आजच्या काळात आपल्या ग्राहकांच्या वाढत्या मागणीच्या आव्हानाला सामोरे जावे लागते. दरवर्षी ग्राहकांच्या नवनवीन मागण्या येतात, ज्यामुळे होलसेलर्सना आपल्या गोदामांची क्षमताही वाढवावी लागते. नवीन मागणीमुळे मागे पडलेल्या जुन्या वस्तूही कुठे खपवाव्या, हाही प्रश्नच असतो.

उपाय

ई-कॉमर्स बिझनेसमधील जबरदस्त स्पर्धेमुळे रिटेलर्सलासुद्धा ग्राहकांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी सजगच नव्हे तर समर्थही असावे लागते. अशाचप्रकारे होलसेलर व्यापाऱ्यालाही बदलत्या काळानुसार स्वतःमध्ये आणि स्वतःच्या व्यापार करण्याच्या पद्धतीत बदल घडवून आणणे अतिशय महत्त्वाचे आहे, नाहीतर या स्पर्धेत मागे पडण्याचा धोका असतो. जुना माळ खपवण्यासाठी ठोक व्यापाऱ्याला अशा बाजारपेठांच्या शोधात राहावे लागेल, जिथे जुन्या मालाला मागणी असेल. आणि तो विकण्यासाठी त्याला आपल्या मार्केटिंग टीमला नीट शिकवून तयार करावे लागेल.

7. रिटेलर्स आणि कारखानदारांचे साटेलोटे

होलसेल व्यापाऱ्यांना आपल्या व्यवसायातून वजा करण्यासाठी कारखानदारांनी रिटेलर्सशी बांधलेल्या थेट संधानामुळे होलसेल व्यापाऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. अधिक नफा कमावण्यासाठी कारखानदार किंवा मॅन्युफॅक्चरर्स थेट दुकानदारांना आपला माल विकू पाहतात आणि दुसरीकडे त्यांना अधिक बचतीचे प्रलोभनही देतात. ज्याला बळी पडून दुकानदार थेट कारखानदारांकडून माल खरेदी करू लागतात. त्यामुळे मधल्यामध्ये होलसेल व्यापाऱ्यांच्या बिझनेसवर परिणाम होतो.

उपाय

होलसेल व्यापाऱ्याला यातून मधला मार्ग शोधणे अत्यावश्यक आहे. यासाठी त्यांनी मॅन्युफॅक्चरर्सकडे आपल्या व्हेंडरला पाठवून करार करायला हवा. यामध्ये कारखानदार आपल्या मनाप्रमाणे  कुठेही आणि कधीही आपल्या मालाचा सप्लाय करू शकणार नाहीत, ते रिटेलर्सला त्यांच्याकडून थेट सामान खरेदी करायला सांगू शकणार नाहीत, इ. बाबींचा या करारात समावेश करायला हवा. ठोक व्यापाऱ्यांनी याशिवाय, निवडक बाजारपेठेत आपल्या स्थानिक व्हेंडर्सची एक टीम बनवून रिटेलर्सच्या मागणीनुसार वेळेत मालाचा पुरवठा करायला हवा. जेणेकरून, रिटेलरचा वेळ आणि त्रास दोन्ही वाचतील. वेळेत माल मिळाल्यामुळे त्यांचीही पैशांची आवक वाढेल आणि तेही कारखानदारांच्या मोहजाळातून बाहेर पडतील. याचाच लाभ होलसेलर्सला मिळेल.

8. मोठ्या गुंतवणुकीवर कमी नफा

होलसेल व्यापाऱ्यांची सर्वात मोठी समस्या म्हणजे त्यांना गुंतवणूक खूप मोठ्या प्रमाणावर करावी लागते, पण नफा मात्र त्या हिशोबाने अगदी कमी मिळतो. याचे कारण असे की, होलसेल व्यापारी किरकोळ विक्रेत्यांसोबतच आपला व्यवसाय करतात. त्यांना जीवतोड स्पर्धेचा सामना करूनही रिटेलरच्या तुलनेत अर्धाच नफा मिळतो. त्यांना रिटेलर्सवरही अवलंबून राहावे लागते, ज्यांची संख्या मर्यादित असते. पण रिटेलर्सकडे मात्र होलसेल व्यापाऱ्यांच्या ऐवजी थेट मॅन्युफॅक्चरर्सकडून सामान खरेदी करून अधिक फायदा करून घ्यायचा पर्याय केव्हाही उपलब्ध असतो.

उपाय

होलसेल व्यापारी म्हणजे कारखानदार आणि रिटेलर्सच्या मधला दुवाच! या दोघांमध्येही त्याला ताळमेळ बनवण्याची कला यायला हवी. म्हणून त्याला अशी युक्ती शोधून काढायला हवी की, जेणेकरून, तो दोघांच्याही गरज सहज पूर्ण करू शकेल. प्रत्येक बिझनेसमध्ये कोणती ना कोणती समस्या अमोर येतच असते. कधीकधी अशीही वेळ येते की, जेव्हा मॅन्युफॅक्चरर आणि रिटेलर दोघांनाही एकाच होलसेलरची वेळी मदत घ्यावी लागते. होलसेल व्यापाऱ्याला अशा संधींच्या शोधात राहायला हवे.

9. कामगारांच्या सुरक्षिततेची चिंता

होलसेल व्यापार पूर्णपणे वाहतुकीवर अवलंबून असतो. त्यांना वेगवेगळ्या ठिकाणांहून माल घ्यावा लागतो आणि दुसरीकडे तो पोहोचवावा लागतो. यामध्ये त्यांना नफ्यासाठी खूपच कमी मार्जिन मिळते. दुसऱ्या शब्दात सांगायचे झाले तर, खूप कमी फायद्यामध्ये खूप जास्त चांगली सेवा द्यावी लागते. त्यामुळेच होलसेल व्यापारी कमीतकमी कामगारांना कामावर ठेवतात आणि मग त्या कामगारांना अथक परिश्रम करावे लागतात. यामुळे अपघातही होतात आणि याचा भुर्दंड पुन्हा होलसेल व्यापाऱ्यालाच सोसावा लागतो.

उपाय

होलसेल व्यापाऱ्यांनी भलेही आपल्या कामगारांवर होणाऱ्या खर्चांना मर्यादित ठेवावे पण त्याचबरोबर आपल्या कामगारांच्या तब्येतीची आणि सुरक्षिततेची काळजीही घ्यावी. यासाठी त्यांनी ट्रेंड किंवा प्रशिक्षित कामगारांबरोबर शिकाऊ किंवा मदतनीस कामगारांना ठेवावे आणि ते पूर्णपणे आपल्या कामात तरबेज झाल्यावर त्यांना पूर्णवेळ कामावर ठेवावे आणि त्या प्रमाणात आपला व्यापारही वाढवावा. म्हणजेच, होलसेल व्यापाऱ्यांचे बजेटही तेवढेच राहील आणि कामगारांची संख्याही वाढेल. त्यामुळे एकाच कामगारावर अवलंबून राहावे लागणार नाही. अशाप्रकारे, हळूहळू कामगार वर्ग वाढवला तर, त्यांच्यावर ताणही येणार नाही आणि ते उत्साहाने आपले कामही करू शकतील.

10. मोठ्या रिटेलर्सची बाजारपेठेतली मक्तेदारी किंवा एकाधिकार

होलसेल व्यापाऱ्यांचे काम रिटेलर्समुळेच चालते आणि त्यामुळे मोठ्या रिटेलर्सना असे वाटते की, माझ्याच बिझनेसमुळे होलसेलर्सचा बिझनेस चालतो आहे. यामुळेच ते होलसेलर्ससमोर नवनवीन अटी ठेवून त्यांना पेचात पकडत राहतात आणि होलसेलर्सना यामुळे खूप टेंशन येत असते.

उपाय

होलसेलर्सनी आपल्या व्यवसायाला थोडासा स्मार्ट लुुक द्यायला हवा. म्हणजेच, ऑफलाईन माल सप्लाय करण्याबरोबरच ऑनलाईन बिझनेससुद्धा सुरु करायला हवा. म्हणजे त्यांना नवीन नवीन ग्राहक मिळत राहतील. यामुळेच आपल्याला कोंडीत पकडणाऱ्या ग्राहकांवरही थोडासा वचक ठेवता येईल. पण हे काम खूपच हुशारीने करायला हवे. आपल्याला आपल्या सेलच्या टारगेटची व्यवस्थित काळजी घेऊन नंतरच व्यवस्थित योजना आखायला हवी, ज्यामध्ये आपल्याला त्रास देणाऱ्या आणि फायदा मिळवून देणाऱ्या ग्राहकांना वेगळे ठेवता येईल. एका मर्यादेनंतर आपल्याला अडचणीत जाणाऱ्या अशा ग्राहकांचा सप्लाय कमी करायला हवा. जेणेकरून, त्यांना कळेल की, त्यांच्याशिवायही आपला बिझनेस चालू शकतो. यानंतर त्यांच्यात बदल झाला तर त्यांना आपल्याकडून मिळवारी सेवा पुरवत करायला हरकत नाही. पण जर बदल नाहीच झाला तर, त्यांना सरळ सोडून द्यायलाही हरकत नाही. कारण एका टेंशनमुळे पुढची दहा कामे बिघडत जातात.

यह भी पढ़े :

  1. एक नया बिजनेस बिना अनुभव के कैसे शुरू करें?
  2. अपने बिजनेस फायदे के लिए जानिए कैसे करें मार्केट रिसर्च
  3. क्यों कराना चाहिए आपको अपने व्यवसाय का इंश्योरेंस?
  4. ओके स्टाफ क्या है? कैसे ये ऐप आपका बिजनेस बढ़ाने में मदद करता है?