किराणा दुकान ही प्रत्येक गावाची आणि त्यातल्या प्रत्येक भागाची जीवनरेखा आहे. हा असा एकमेव उद्योग आहे की, ज्याला महागड्या महाविद्यालयातून घेतलेल्या स्नातकोत्तर किंवा पोस्ट ग्रॅज्युएट डिग्रीची आवश्यक नसते. या व्यवसायाची थोडी-बहुत माहिती, भांडवल आणि आपले किराणा दुकान उघडण्याची तीव्र इच्छा या गोष्टी असल्या, तर आपणही आपले किराणा दुकान सहज टाकू शकता.
किराणा दुकानांमध्ये समाजाच्या सर्व स्तरांमधून ग्राहक येतात आणि त्यामुळेच या व्यवसायात स्पर्धाही जास्त असते. कोविद-१९ मुळे बदललेल्या एकूणच परिस्थितीमुळे पारंपरिक मार्केटिंग पद्धती हा व्यवसाय सुरु करण्यासाठी तितकीशी प्रभावी ठरणार नाही. म्हणून, आम्ही आपल्याला काही प्रभावी टिप्स येथे देणार आहोत, जेणेकरून आपल्याला आपला किराणा दुकानाचा व्यवसाय सुरु करणे आणि वाढवणे या दोन्हींसाठी मदत होईल.
हा व्यवसाय कसा सुरु करावा हे बघण्याआधी आपण काही गोष्टी समजून घेऊया,
किराणा दुकान म्हणजे काय?
- आपल्या दररोजच्या गरजेच्या वस्तूंसाठी असलेले जनरल स्टोअर किंवा दुकान.
- किराणा दुकानांमध्ये आपल्या दैनिक गरजेच्या वस्तू किंवा स्वयंपाकघरात रोजच्या वापरासाठी लागणारी धान्ये, तेल, तूप, इ. मिळते.
- या दुकानाचा लहानमोठेपणा त्या व्यापाऱ्याकडे उपलब्ध असणाऱ्या भांडवलावर अवलंबून असतो.
- किराणा दुकान ही संकल्पना फक्त भारतीय उपखंडातच अस्तित्त्वात आहे.
- किराणा दुकान हा अगदी काही शतकांपासून ते आजपर्यंत चालत आलेला आणि काळाच्या कसोटीला उतरलेला असा व्यवसाय आहे.
- अगदी या कोरोनाच्या महामारीच्या काळातदेखील स्थानिक किराणा दुकानांनी केलेल्या किराण्याच्या विक्रीने कित्येक सुपरमार्केट आणि ई-कॉमर्स वेबसाईट्सनासुद्धा मागे टाकले आहे..
- भारताच्या लहान मोठ्या गावांमध्ये आणि शहरांमध्ये सुमारे 1.5 कोटींहून जास्त किराणा दुकाने आहेत.
किराणा दुकानाचा व्यवसाय अधिक फायदेशीर बनवण्यासाठी खालील गोष्टींमध्ये गुंतवणूक करणे महत्त्वाचे आहे -
- खाजगी आणि सार्वजनिक वाहतुकीची साधने जसे, कार, दुचाकी, बस, रिक्षा, इ.द्वारे पोहोचण्यास सुलभ होईल अशा जागेची किंवा भागाची किराणा दुकान उभारण्यासाठी केलेली निवड ही नियमित, जास्त काळ टिकून राहणारे आणि विश्वासू ग्राहक मिळवण्यासाठी खूप उपयोगी ठरते.
- ग्राहकांना उपयोगी असे वाणसामान आणि दैनिक गरजेच्या वस्तूंचा कायम उपलब्ध असलेला स्टॉक.
- आकर्षक ऑफर्स आणि उधारीवर वाणसामान देण्याची सोय.
- कितीही कमी-जास्त किमतीच्या खरेदीसाठी मोफत घरपोच सेवा.
- डिजिटल पेमेंट आणि ऑनलाईन खरेदीची सुविधा.
- प्रत्येक ग्राहक विशेष असल्याची आणि जिव्हाळ्याची वागणूक.
किराणा दुकान कसे उघडावे?
किराणा दुकान सुरु करण्यासाठी सोप्या पायऱ्या आणि परिणामकारक पद्धती:
पहिली पायरी - ठोस व्यवसाय योजना
- ठोस योजना आणि नियोजन नसेल तर कुठलाही लहान किंवा मोठा व्यवसाय बुडायला वेळ लागत नाही.
- आपल्याला ज्यांच्यासोबत व्यवसाय करायचा आहे अशा ग्राहकांची सांपत्तिक स्थिती काय आहे, हे समजून घ्या आणि त्यानुसार आपल्या दुकानातल्या सामानाची किंमत ठरवा. आपले संभाव्य ग्राहक प्रामुख्याने कोणत्या गोष्टी विकत घेणे पसंत करतील, याचा आढावा घेऊन त्या गोष्टी आपल्या दुकानामध्ये जरूर ठेवा.
- ग्राहकांच्या गरजा, आवडी-निवडी, पसंती-नापसंती आणि किती वरचेवर ते कोणकोणत्या गोष्टी खरेदी करतात, यावरून आपल्याला विक्रीचे धोरण म्हणजेच दुकानात कोणत्या गोष्टी कमी किंवा जास्त प्रमाणात ठेवायच्या, हे ठरवता येईल.
- आपल्या व्यवसायाची ही सुरुवात असेल, हे लक्षात घेऊन कष्टाळू आणि प्रामाणिक लोक कामावर ठेवा.
दुसरी पायरी - दुकानासाठी योग्य जागा
किराणा दुकान टाकण्यासाठी ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. आपल्या व्यवसाय वाढवण्याच्या दृष्टीने दुकानासाठी योग्य जागा निवडणे अतिशय महत्त्वाचे आहे.
- प्रत्येक भागामध्ये राहणारे ग्राहक आणि त्यांच्या दैनंदिन गरजा वेगेवेगळ्या असतात.
- लोकांच्या दैनंदिन गरजा त्यांच्या वयोमानावर अवलंबून असतात. त्यामुळे ज्या भागात आपण दुकान उघडायचे ठरवले असेल, त्या भागातल्या लोकांच्या वयोमानाचा आढावा घेतल्यास त्यांच्या नियमित गरजांनुसार आणि मागणीनुसार आपल्या दुकानात सामान भरून ठेवणे सोयीचे होईल.
- जर आपले दुकान एखाद्या कॉलेजच्या जवळ असेल, तर आपले ग्राहक मुख्यतः तरुण मुले-मुली असतील आणि त्यांच्या गरजांनुसार, जसे, सौंदर्य प्रसाधने, इन्स्टंट खाद्यपदार्थ, इ. आपल्या दुकानात ठेवणे फायद्याचे ठरेल.
- जर आपले दुकान एखाद्या खेडेगावात उघडणार असाल, तर तिथल्या लोकांच्या गरजाही अगदी प्राथमिक किंवा साध्या असतील आणि त्यामुळे फार महागड्या वस्तू आपल्या दुकानात ठेवणे फायद्याचे ठरणार नाही.
तिसरी पायरी - आपल्या ग्राहकांना ओळखणे
किराणा दुकानासाठी जागा निवडल्यावर आपले नियमित आणि कायमस्वरूपी ग्राहक ओळखणे यावर लक्ष केंद्रित करायला हवे.
- त्यांना नेहमी कोणत्या वस्तू लागतात?
- साधारणपणे,आपल्या दुकानाच्या २ किलोमीटरपर्यंतच्या परिसरात राहणारे लोक आपले ग्राहक असतात.
- शहराच्या नवीन वसलेल्या भागात आपला व्यवसाय वाढवणे नेहमीच फायद्याचे ठरते. कारण, भाग नवीन असल्यामुळे तिथल्या जागांच्या किमती जरा कमी असतात. त्याशिवाय आपले दुकान तिथे जर सर्वात पहिले असेल, तर निश्चितच याचा आपल्या व्यवसायाला फायदाच होतो.
हे वाचा: Eco-Friendly Business Ideas for Small Business Owners
चौथी पायरी - आपल्या गुंतवणुकीचा हिशोब
आपल्या दुकानाची जागा, त्यात आपण ठेवणार असलेले सामान, ज्यांच्याकडून आपण सामान खरेदी करणार ते होलसेलर्स आणि आपल्या दुकानात काम करणारे लोक, यांच्यासोबतच आपल्या व्यवसायासाठी लागणाऱ्या भांडवलाचा हिशोब करायला विसरू नका.
- जर आपण एखादे छोटे किराणा दुकान घालणार असाल तर आपल्या दुकानात आपल्याला कमी कर्मचारी आणि कमी प्रमाणात सामान ठेवणे योग्य होईल.
- दुकानाची जागा, भाडे, माल-सामान, आटोपशीर पण सर्व दैनंदिन गरजा पुरवणारे एअर-कंडिशन्ड दुकान, अशा वेगवेगळ्या प्रकारांवर गुंतवणुकीचे प्रमाण अवलंबून असते.
थोडक्यात,एखादे बऱ्यापैकी किराण्याचे दुकान उघडण्यासाठी सुरवातीला साधारणपणे 50,000 ते 2 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करावी लागू शकते.
पाचवी पायरी - आपले दुकान डिजिटल करा
- कोरोना महामारीच्या या संकटकाळामध्येसुद्धा आपल्या दैनंदिन गरजेच्या वस्तू उपलब्ध करून देण्याची सोय असल्यामुळे, केवळ किराणा आणि औषधांची दुकाने जास्त झळ न पोहोचता टिकून राहिली आहेत.
- कोरोनाच्या संसर्गापासून वाचण्यासाठी बाहेर जाणे टाळण्यासाठी बरेच जण ऑनलाईन शॉपिंग करणे पसंत करत आहेत.
- आपले दुकान डिजिटल करणे म्हणजे केवळ घरपोच सेवा आणि WhatsApp बिझनेस नव्हे तर आपली ग्राहकांसोबतची उधारी किंवा वसूली OkShop च्या मदतीने सांभाळणे होय.
- यामध्ये आपल्या दुकानातील वस्तू आपण ऑनलाईनदेखील विकायला ठेवू शकता.
सहावी पायरी - विविध परवाने आणि कागदपत्रे
भारतमध्ये किराणा दुकान उघडण्यासाठी काही परवाने आणि कागदपत्रे लागतात. तसेच दुकानासंबंधी असलेल्या कायद्यांचे पालन करणे अनिवार्य असते.
या परवान्यांमध्ये खालील कागदपत्रांचा समावेश होतो-
- दुकाने आणि संस्था नोंदणीचा दाखला
- अन्न परवाना किंवा फूड लायसन्स
- व्यवसाधारकाचा परवाना
- जीएसटी अतंर्गत आपण आपल्या व्यवसायाची नोंदणी केल्यास आपल्याला विविध करांवरती सवलती आणि सूटसुद्धा मिळू शकतात.
- जर आपली वार्षिक व्यावसायिक उलाढाल 20 लाखांपेक्षा जास्त असेल तर आपल्याला आपला GSTIN किंवा आपला एकमेव 15-अंकी ओळख नंबर मिळवणे अनिवार्य आहे.
सातवी पायरी - साप्ताहिक सुट्टी
बहुतेक दुकानदारांच्या आठवड्याच्या इतर दिवशी दुकानाच्या विशिष्ट वेळा असतात, जसे सकाळी १० ते रात्री ८ इ.
- जास्त वेळ दुकान उघडे ठेवल्यास, आपल्या परिसरात राहणाऱ्या लोकांच्या मनात आपल्या दुकानात त्यांना आवश्यक ते सर्व आणि कधीही मिळेल, अशा प्रकारचा विश्वास निर्माण होतो.
- बरेच ग्राहक आठवड्याच्या इतर दिवशी आपापल्या कामात व्यस्त असल्यामुळे आठवडी सुट्टीच्या दिवशी म्हणजे शनिवारी, रविवारी खरेदी करणे पसंत करतात, त्यामुळे आठवडी सुट्टीच्या किंवा सणवारांच्या दिवशीसुद्धा आपले दुकान चालू ठेवल्यास आपल्या व्यवसायासाठी ते फायदेशीर ठरू शकते.
- ठराविक वेळा सोडून इतर वेळीसुद्धा आपले दुकान चालू असल्यास नियमित ग्राहक आणि त्यांच्याकडून पसंतीची पावती तर मिळतेच; शिवाय, आपल्या दुकानाची त्यांच्याकडून प्रसिद्धीदेखील व्हायला सुरुवात होते.
आठवी पायरी - व्यवसायातील स्पर्धक
आपले दुकान उघडण्याआधी जवळपासच्या आपल्या स्पर्धकांच्या म्हणजे इतर किराणा दुकानदारांच्या दुकानात जाऊन आपली स्पर्धा कोणाशी आहे याचा अंदाज घ्या.
- त्यांनी दुकान कसे मांडले आहे, कोणकोणत्या वस्तू ते नेहमी विकायला ठेवतात, याचा आढावा घ्या.
- आपल्याला व्यवसायाच्या दृष्टीने कोणकोणत्या संधी उपलब्ध आहेत आणि आणि आपला व्यवसाय वाढवण्याच्या दृष्टीने कोणत्या नवीन योजना आपण आखू शकतो, याचा विचार करा.
- आपल्या स्पर्धकांचा अभ्यास करा आणि त्यांच्या व्यवसायाची परिणामकारक जाहिरात ते कशी करतात, हेही बघा.
हे वाचा: Mantras and Tips for a successful business
नववी पायरी - अतिरिक्त सेवा
- आपल्या दुकानाचे आकर्षक इंटेरिअर करण्यापासून ते मोफत घरपोच सेवा देणे यासारख्या अनेक बाबींचा विचार आपण करू शकता. ग्राहक लहान असो किंवा मोठा, गरीब असो किंवा श्रीमंत, प्रत्येक ग्राहकाला जिव्हाळ्याची आणि विशेष वागणूक दिलेली नेहमीच आवडते.
- आपल्या भागातल्या इतर किराणा दुकानांमध्ये आपले दुकान विशेष महत्त्वाचे ठरावे म्हणून काय काय विशेष किंवा अतिरिक्त सेवा आपण आपल्या ग्राहकांना देऊ शकतो, याचा विचार करा.
- उत्तम दर्जाच्या वस्तू मिळण्याची खात्री किंवा काही विशेष ब्रॅण्डच्या उत्पादनांना आपल्या दुकानात प्राधान्य देणे, यासारख्या छोट्याछोट्या गोष्टीही आपल्याला मोठा फायदा मिळवून देऊ शकतात.
दहावी पायरी - आकर्षक सूट
जेव्हा आपण किराण्याचे दुकान नवीनच सुरु करता, तेव्हा ग्राहकांना आपल्या दुकानात आकर्षित करण्यासाठी आणि आपली विक्री वाढवण्यासाठी आपल्याला नवनवीन पद्धती शोधून काढणे गरजेचे असते.
- आपले दुकान कितीही लहान किंवा मोठे असले तरी, त्याकडे ग्राहकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी त्याची जाहिरात करणे अतिशय आवश्यक आहे आणि त्यासाठी उपलब्ध सर्व स्रोत वापरणेही तेवढेच आवश्यक आहे. जसे, आपले कुटुंब, मित्रमंडळी, नातेवाईक त्यांच्याकडून आपल्या व्यवसायाची कर्णोपकर्णी जाहिरात करवणे, हे भारतीय स्थानिक उद्योगधंद्यांची जाहिरात करण्यासाठी एक अतिशय प्रभावी साधन आहे.
- आपल्या दुकानाबद्दल माहिती सांगणारी फ्लायर, पॅम्प्लेट्स छापून ती वर्तमानपत्रातून घरोघरी पोहोचवणे. मोबाईल मार्केटिंग करणे, तसेच स्थानिक वर्तमानपत्रात आपल्या किराण्याच्या दुकानाच्या जाहिराती देणे, याचाही आपल्या व्यवसायाच्या वाढीसाठी खूप उपयोग होतो.
- आपण सोशल मीडियावरदेखील आपल्या किराणा दुकानाची जाहिरात करू शकता आणि जास्तीतजास्त ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी डिस्काऊंट कूपन्स किंवा वाऊचर्ससुद्धा आपल्या पेजवर ऑनलाईन ठेवू शकता.
भारतात किराणा व्यवसाय फायद्याचा आहे का?
- आपल्या किराणा व्यवसायाचा नीट जम बसवण्यासाठी आपल्या दुकानात वाणसामान नियमित भरून ठेवणे, आपल्या परिचयातील ठोक विक्रेते किंवा होलसेलर्सकडून डाळ, तांदूळ, कणीक, शाम्पू, साबण, तेल, इ. दैनंदिन गरजेच्या वस्तू किफायतशीर भावात घाऊक विकत घेणे अतिशय आवश्यक आहे.
- या क्षेत्रात स्पर्धा खूप आहे पण वरील टिप्सचा वापर करून आपण थोड्याच काळामध्ये आपल्या किराणा दुकानाचा चांगला जम बसवू शकता आणि चांगले नावही कमवू शकता.
- आपल्या व्यवसायातील स्पर्धेमध्ये नेहमी जिंकण्यासाठी आणि टिकून राहण्यासाठी आपल्या दुकानात काम करणारे कामगार आणि आपले नियमीत ग्राहक या दोघांशीही दीर्घकाळ टिकणारे सलोख्याचे संबंध जोपासणेही तितकेच आवश्यक आहे.
OkCredit के ब्लॉग के साथ पाएँ बेस्ट बिज़नेस आइडीयाज़ और बिज़नेस टिप्स कई भाषाओं में जैसे की हिंदी, अंग्रेज़ी, मलयालम, मराठी और भी कई भाषाओं में.
डाउनलोड करें OkCredit अभी और छुटकारा पाएँ रोज़ की झंझट से.
OkCredit 100% भारत में बनाया हुआ ऐप है!
FAQs - वारंवार विचारले जाणारे प्रश्न
प्रश्न: किराणा दुकानाचा व्यवसाय कसा सुरु करावा?
उत्तर: किराणा दुकान व्यवसाय सुरु करण्यासाठी आपल्याला खालील गोष्टींची आवश्यकता आहे -
- व्यवस्थित आखलेला व्यवसायाचा आराखडा किंवा बिझनेस प्लॅन
- दुकानासाठी जागा निवडणे
- आपल्या ग्राहकांना समजून घेणे
- आपल्या गुंतवणुकीचा हिशोब करणे
- आपले स्टोर डिजीटल करणे
- आवश्यक ते सर्व परवाने/ परवानग्या घेणे
- आठवडी सुट्टीच्या दिवशी दुकान सुरु ठेवणे
- आपल्या स्पर्धकांवर नजर ठेवणे
- अतिरिक्त सेवा
- आकर्षक सूट देऊ करणे
प्रश्न: किराणा व्यवसाय फायदेशीर आहे का?
उत्तर:
✓होय, दीर्घकाळाचा विचार करता किराणा दुकान फायदेशीर आहे.
✓छोट्या प्रमाणात व्यवसाय सुरु केल्यास आपल्याला बाजारपेठेचा अंदाजही घेता येईल आणि आपल्या व्यवसायात छोट्या प्रमाणावर वेगवेगळे प्रयोग करून अपयशी होणे टाळताही येईल.
प्रश्न: किराण्याचे छोटे दुकान कसे सुरु करावे?
उत्तर: किराण्याचे छोटे दुकान सुरु करण्यासाठी आपल्याला या गोष्टींची गरज भासेल-
- आपल्या विशेषता किंवा जमेच्या बाजू ओळखा
- एखादा भांडवलदार शोधा किंवा बँकेकडून कर्ज मिळवा
- एखादी छोटी जागा भाड्याने घ्या किंवा भाडेपट्टीवर मिळवा
- नफा मिळायला सुरुवात होण्याआधीच अतिरिक्त कामगार ठेवू नका
- विश्वासू होलसेलर्स किंवा ठोक/ घाऊक विक्रेते शोधा आणि योग्य किमतीवर सामान विकत घ्या
- वेगवेगळ्या प्रसंगी वेगवेगळ्या ब्रॅण्ड्सना प्राधान्य द्या.
प्रश्न: किराणा दुकाने म्हणजे काय?
उत्तर:
✓किराणा दुकान म्हणजे आपल्या दैनंदिन गरज पुरवणारे दुकान.
✓साधारणपणे, छोटेखानी किराणा दुकाने जास्तीत जास्त किरकोळ किंमत म्हणजेच एम आर पी मध्ये वस्तू विकतात आणि नूडल्स, कपड्यांचा साबण, अंगाचा साबण, स्वयंपाकघरात लागणाऱ्या वस्तू, इ. विकतात.
प्रश्न: किराण्याला मराठीत काय म्हणतात?
उत्तर: किराणा (kɪˈrɑːnə ) (भारतात) हा हिंदी भाषेतला शब्द असून त्याला मराठीत, वाणसामानाचे किंवा किराणा-भुसार दुकान असेही म्हणतात, जिथे आपल्याला आपल्या कुटुंबासाठी लागणाऱ्या दैनंदिन गरजेच्या वस्तू मिळतात.
प्रश्न: कालौघात किराणा दुकाने टिकून राहतील?
उत्तर:
✓या जागतिक महामारीच्या काळात भरभराटीला आलेल्या काही व्यवसायांपैकी एक म्हणजे किराणा दुकानाचा व्यवसाय.
✓होय, वर्षाच्या कोणत्याही मौसमात किंवा ऋतूत चालणारा एकमेव व्यवसाय म्हणजे किराणामालाच्या दुकान.
प्रश्न: भारतात किराण्याच्या दुकान टाकणे फायदेशीर आहे का?
उत्तर:
✓होय, भारतामध्ये सर्वात जास्त चालणाऱ्या व्यवसायांपैकी अन्नउद्योग एक आहे.
✓योग्य गुंवणूक आणि जाहिरात केल्यामुळे किराणा व्यवसाय आपल्याला सुरुवातीच्या काही महिन्यांतच नफा मिळवून देऊ शकतो.
प्रश्न: किराणा दुकानासाठी आवश्यक परवाने कोणते?
उत्तर: खालील परवाने किराणा दुकानासाठी आवश्यक आहेत -
- दुकाने आणि संस्था नोंदणीचा दाखला
- अन्न परवाना किंवा फूड लायसन्स
- व्यवसाधारकाचा परवाना
- FSSAI परवाना
प्रश्न: भारतातील किराणा दुकानात नफा किती आहे?
उत्तर:
✓आपले दुकान कितीही लहान-मोठे असले तरीही, भारतातील किराणा व्यवसायामध्ये आपण कमीतकमी 5% ते जास्तीतजास्त 25% इतका नफा कमवू शकता.
✓किराणा व्यवसाय हा भारतातील एक सर्वात यशस्वी व्यवसायांपैकी एक आहे. त्यामुळे विविध स्थानिक आणि परदेशी ब्रँड्स सामान्य ग्राहकांच्या मनात आणि घरात स्थान मिळवण्यासाठी किराणा दुकानांचा मार्ग निवडतात.
प्रश्न: किराणा दुकान कसे चालते?
उत्तर:
✓साधारणपणे, एका आठवड्याच्या उधार परतीच्या बोलीवर होलसेलर्सकडून लोकांच्या दैनंदिन गरज भागवण्यासाठी लागणारे सामान छोट्या दुकानदारांकडून विकत घेतले जाते.
✓किराणा दुकानातील सामान उधारीवर घेतले जाते आणि नफा तत्त्वावर विकले जाते. यानंतर होलसेलर किंवा घाऊक विक्रेत्यांचे देणे चुकवले जाते.
प्रश्न: ऑनलाईन किराणा दुकान कसे सुरु करावे?
उत्तर: ऑनलाईन व्यवसाय सुरु करण्यासाठी अनेक पद्धती आहेत. परंतु, इ-कॉमर्स वेबसाईटसोबत भागीदारीत आपला व्यवसाय सुरु करण्यापेक्षा आपले दुकान डिजिटल बनवणे केव्हाही फायद्याचे आहे. जर आपल्याला आपला व्यवसाय मोफत डिजिटल करायचा असेल किंवा ऑनलाईन सुरु करायचा असेल तर- OkShop वापरा. या ॲपच्या साहाय्याने आपल्याला-
- कॅटलॉग म्हणजेच आपल्या दुकानात उपलब्ध वस्तूंचा अल्बम तयार करता येतो
- WhatsAppवरून त्यांचे फोटो आणि इतर तपशील आपल्या ग्राहकांसोबत शेयर करता येतो
- पेमेंट करण्यासंबंधी रिमाईंडर आणि मेसेज पाठवता येतात
- आपल्या दैनिक विक्रीचा ताळमेळ ठेवता येतो.
- हे वापरायला आणि समजायला खूप सोपे ॲप आहे
- हे विविध भाषांमध्ये उपलब्ध आहे
प्रश्न: किराणा दुकान टाकण्यासाठी किती गुंतवणूक करावी?
उत्तर: भारतात, किराणा दुकानासाठी लागणारे विविध परवाने, भाडे, दुकानातील सोयी, इ. मिळून सुरुवातीला सुमारे 50,000 रुपयांपर्यंत गुंतवणूक करावी लागू शकते.
प्रश्न: भारतात किती किराणा दुकाने आहेत?
उत्तर:
✓विविध सर्वेक्षणे आणि माहितीनुसार भारतात सुमारे 1.5 कोटी किराणा दुकाने आहेत.
✓भारतातील सर्वात फायदेशीर व्यवसायांपैकी किराणा दुकान हा एक व्यवसाय आहे.